अंडर-23 विश्व कुस्ती स्पर्धेत हिंदुस्थानचा ग्रीको-रोमन गट पहिल्याच दिवशी नामोहरम!

अंडर-23 विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या ग्रीको-रोमन गटाने निराशाजनक कामगिरी केली. चारही गटातील कुस्तीपटू एकही सामना जिंकू शकले नाहीत आणि सर्वांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. 63 किलो गटात गौरव, 77 किलो गटात अंकित, 87 किलो गटात रोहित बुरा आणि 130 किलो गटात जोगिंदर राठी हे चारही कुस्तीपटू प्रतिस्पर्ध्यांसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. गौरवचा सामना किर्गिस्तानच्या कुट्टूबेक ए. अब्दुराजाकोवशी झाला आणि तो तांत्रिक श्रेष्ठतेमुळे हरला. अंकितलाही सर्बियाच्या जालान पेककडून अशाच पद्धतीने पराभव पत्करावा लागला. क्वॉलिफिकेशन फेरीत रोहितला अमेरिकेच्या पेटन जे. जैकबसनकडून पराभवाचा धक्का बसला, तर जोगिंदरला उजबेकिस्तानच्या दामिरखोन रख्मातोवने सहज हरवले. पहिल्याच दिवशी झालेल्या या पराभवांनी हिंदुस्थानच्या ग्रीको-रोमन पथकाची मोहीम अडखळली असून पुढील फेऱ्यांत पुनरागमन करणे हेच आता संघापुढचे मोठे आव्हान ठरणार आहेग्रीको-रोमन पथकाची मोहिम अडखळली असून पुढील फेऱ्यांत पुनरागमन करणे हेच आता संघापुढचे मोठे आव्हान ठरणार आहे.
Comments are closed.