डॉ. अनिल काकोडकर यांना हृदयनाथ पुरस्कार, 26 ऑक्टोबरला होणार वितरण

हृदयेश  आर्ट्सतर्फे  दिला जाणारा यंदाचा हृदयनाथ पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना दिला जाणार आहे. भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 88 वा वाढदिवस व हृदयेश आर्ट्सच्या 35 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार, 26 ऑक्टोबर रोजी  रात्रौ 8.30 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाटय़गृहात सादर होणाऱया विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

आतापर्यंत भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, बाबासाहेब पुरंदरे, सुलोचना दीदी, बुद्धिबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंद, संगीतकार ए. आर. रहेमान, खय्याम, पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद झाकीर हुसेन या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लतादीदींच्या आठवणींना उजाळा

मंगेशकर कुटुंबीय व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळय़ानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘दीदी आणि मी’ हा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवन प्रवाहातील अनेक आठवणींना उजाळा देणारा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. हा सोहळा रसिकांसाठी विनामूल्य असून बुधवार, 24 ऑक्टोबरपासून विनामूल्य प्रवेशिका मास्टर दीनानाथ नाटय़गृहात उपलब्ध असतील, असे आयोजकांनी कळविले आहे.

Comments are closed.