औक्षण का करावे? काय सांगते शास्त्र?

दिवाळीतील पाचही दिवस महत्त्वाचे असतात. दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला आणि भाऊबीजेला बहिण -भावाला ओवाळते, त्याचे औक्षण करते. हिंदू धर्मात औक्षण करणे शुभ मानले जाते. लग्न कार्याच्यावेळी अथवा इतर शुभ प्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्याचे मंगलकार्य आहे, उदाहरण द्यायचे झाल्यास वाढदिवसाच्या दिवशीही औक्षण केले जाते. पण, औक्षण करण्यामागचा अर्थ काय? शास्त्र याबद्दल काय सांगते? चला जाणून घेऊयात याचे उत्तर,

औक्षण म्हणजे काय?

औक्षण एक संस्कार आहे. त्यासोबतच ही एक मंगल भावना आहे. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट ही विज्ज्ञानाचा आधार घेऊन बनवण्यात आली आहे. मनुष्याचा जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात, त्यामागे शास्त्र आहे. कोणत्याही क्षणाचे स्वागत करताना, विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या अध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दिव्यातील ज्योती प्रकाशित आणि जलदगतीने करते, असे शास्त्र सांगते. त्यामुळे हिंदू धर्मात औक्षण करण्याला अधिक महत्त्व दिले जाते.

औक्षणासाठी लागणारे साहित्य –

हळद-कुंकू, तुपाचे किंवा तेलाचे निरांजन, अक्षता, कापूस अशा गोष्टींची आवश्यकता असते.

दिशा –

औक्षण करीत असताना देवासमोर पाट ठेवून पूर्व पश्चिम बसवून औक्षण करावे, असे करणे शुभ मानले जाते.

कसे केले जाते औक्षण ?

  • पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी.
  • आता कोणाचे औक्षण करायचे आहे, त्याला पाटावर बसवा.
  • यानंतर मधल्या बोटाने ओलं कुंकू लावून त्यावर अक्षता लावाव्यात.
  • निरंजनाचे ताट घेऊयन त्यातील सोन्याची अंगठी चेहऱ्याभोवती फिरवा.
  • व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून अंगठी फिरवून त्यातील सुपारी घेऊन डाव्या खांद्यापर्यंत न्यावी.
  • तसेच आता विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावर यावे. असे तीन वेळा करावे.
    यानंतर व्यक्तीची आरती करावी.
  • व्यक्तीला मिठाई खायला द्यावी.

हेही वाचा – Diwali Padwa: पती-पत्नीने एकमेकांना द्यावेत हे गिफ्ट, पाडवा होईल स्पेशल

Comments are closed.