डॉक्टरांनी चितारल्या मनोवेधक रांगोळय़ा, गुरुकृपा हार्ट फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

रोज चिमटे, कात्री, कटर, सुई-दोरे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असा फौजफाटा घेऊन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देणारी बोटे चक्क रांगोळ्या चितारत होती. एखाद्या कसलेल्या रांगोळी कलावंतालाही मागे टाकेल अशा कलाकृतींनी जुहू येथील एमसीव्हीपी सभागृहाचे दालन भरून गेले होते. निमित्त होते प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन आणि अंधेरी मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स आणि त्यांच्या पुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. स्मृती रत्नपारखी, डॉ. प्रांजल रत्नपारखी, डॉ. राजेश घाटकर, डॉ. शशांक शाह, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. शरद दधीच, डॉ. राम चव्हाण, डॉ. अशोक सिंग यांनी केले. प्रथम क्रमांक डॉ. प्रियंका पाटील, द्वितीय क्रमांक डॉ. सोनाली डोंगरे तर तृतीय क्रमांक डॉ. योगेंद्र विश्वकर्मा आणि डॉ. नीलिमा शेट्टीवार यांनी पटकावला.  या सोहळय़ात डॉक्टरांनी शेरोशायरी आणि गाणीही सादर केली. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून डॉक्टरांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राम चव्हाण, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. शशांक शाह, डॉ. राजेश तिवारी, डॉ. सीमा तिवारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.