मुंबईत आम्ही राज ठाकरे काय उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, काँग्रेसच्या भाई जगतापांचं वक्तव्य


BMC निवडणूक 2026 वर भाई जगताप: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस (Congress) नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप (Bhai Jagtap) यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच गोष्टी सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणू लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.

मी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत सांगितले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये, राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. काँग्रेसने आजपर्यंत कधीही, ‘राज ठाकरेंना सोबत घेऊ’, असे म्हटलेले नाही. मविआत शिवसेना एकटीच नाही. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा शिवसेना एकटीच होती. आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्बळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा. स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही, असे भाई जगताप यांनी सांगितले.

काँग्रेस न्यूज : माणूस हाच आमचा मूलभूत फरक, आमची भूमिका त्यांची भूमिका : सचिन सावंत

आमची बैठक झाली चेन्नीथला यांच्यासोबत त्यावेळी आम्ही आमची मतं मांडली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत, त्यामध्ये काही शंका नाही. प्रत्येक नेत्याची भूमिका चेन्नीथला यांनी ऐकून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन वरिष्ठ नेते निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड याबाबत सगळ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेईल, असे काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले.

आणखी वाचा

मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!

आणखी वाचा

Comments are closed.