गुडन्यूज! पाडव्यादिवशी सोने, चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजा
आजचे सोन्याचे दर: गेल्या काही दिवसांपासून किमतींची उड्डाणे गाठणाऱ्या सोन्याचे भाव गेल्या 24 तासात जवळपास 4000 रुपयांनी घसरले आहेत. तर चांदीच्या किमतीही कमी झाल्या आहेत, त्यामुळे दिवाळीत ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख 34 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होते. आज हेच दर जीएसटीसह एक लाख 31 हजार 500 रुपयांवर आले आहेत. चांदीचा भावही आपटला असून जवळपास 8 हजार रुपयांनी घसरून एक लाख 50 हजार रुपयांवर चांदी गेलीय. (Gold Silver Rates Today)
बुलियन असोसिएशनच्या ताज्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1 लाख 28 हजार 40 रुपये प्रति 10 ग्रॅम असून किलोमागे चांदी एक लाख 50 हजार 50 रुपयांवर गेली आहे . हे दर जीएसटीशिवाय आहेत .
10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतायत ?
24 कॅरेट सोन्यासाठी एक लाख 28 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम ग्राहकांना मोजावे लागतील .तर चांदी किलोमागे एक लाख 50 हजार 50 रुपयांवर गेली आहे . तोळ्यामागे 149,343 रुपयांवर भाव गेले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 17 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम गेलाय .तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 96 हजार 30 रुपयांवर पोहोचला आहे . तर तोळ्यामागे 136,898 रुपये ग्राहकांना द्यावे लागतील.
चांदीच्या किमतीही घसरल्या
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 1 किलो चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरुन 1 लाख 50 हजार रुपयांवर आली. तर, 20 ऑक्टोबरला आयबीजेएच्या वेबसाईटवर चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले होते. चांदीसह सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्या वायद्याच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 2500 रुपयांनी कमी झाली. सोन्याचे दर 128000 वर आले.
सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार कशाने ?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे .अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने केलेल्या संभाव्य व्याजदर कपातीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यात पैसे गुंतवत आहेत . आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती अमेरिकन डॉलर मध्ये निश्चित केला जातात त्यामुळे डॉलर रुपया विनिमय दरातील कोणताही बदल भारतातील सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम करतो . शिवाय युद्ध, मंदी आणि व्याजदरातील बदल यासारख्या जागतिक व आर्थिक अस्थिरतेमुळेही सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहे . जेव्हा बाजारातील अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या अस्थिर मालमत्तेपासून सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळतात, ज्यामुळे त्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढते.
आणखी वाचा
Comments are closed.