कुलदीप यादव इन झाल्यास आऊट कोण होणार? दुसऱ्या वनडेत भारतीय संघात कुणाला संधी?


ॲडलेड:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरी मॅच उद्या ॲडिलेड येथे होणार आहे. दुसऱ्या वनडेत शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघ मैदानात उतरेल.  दुसऱ्या वनडेत भारताला मिशेल मार्शच्या ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवावा लागेल. पहिल्या वनडेत पर्थमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या वनडेत भारतावर 7 विकेटवर विजय मिळवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे पहिल्या वनडेत अपयशी ठरले होते. दुसऱ्या वनडेत कुलदीप यादवला संघात संधी मिळू शकते.

ॲडिलेड मॅचपूर्वी फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मालिकेपूर्वी लयीत नव्हते? या प्रश्नाचं उत्तर देताना कोटक म्हणाले, मला असं वाटत नाही, त्या दोघांनी आयपीएल खेळलं आहे. दोघांची तयारी चांगली झाली, दोघांकडे चांगला अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाला येण्यापूर्वी त्यांच्याकडे तयारीला वेळ होता, त्यांनी तयारी पूर्ण केली आहे.सीतांशू कोटक यांनी पहिल्या मॅचमध्ये पावसाचा परिणाम झाला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर त्यांची स्थिती देखील तशीच झाली असती.

कुलदीप यादवला संधी मिळणार?

भारतानं पहिल्या वनडेमध्ये कुलदीप यादवला संधी दिली नव्हती. कुलदीप यादवनं आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्या वनडेत शुभमन गिलनं वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली होती. पहिल्या वनडेत भारताच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नव्हता त्यामुळं दुसऱ्या वनडेत कुलदीप यादवला संधी मिळते का ते पाहावं लागेल.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, मिचेल ओन, ॲलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट.

भारताचा संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन),विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव , वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, धृव जुरेल.

ऑस्ट्रेलियाचा संघ

मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅट रेनशॉ,एडम झम्पा,बेनड्वारशुइस

आणखी वाचा

Comments are closed.