आशिया कप ट्रॉफी वादात BCCI घेणार अंतिम निर्णय! जय शाह- मोहसिन नक्वींचा होणार आमना-सामना

आशिया कप ट्रॉफी (Asia Cup 2025) वाद कधी सुटेल? सध्या या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे कठीण आहे, कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार BCCI ने मोहसिन नक्वीची मागणी नाकारली आहे. ACC आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) म्हणाले होते की, BCCI किंवा टीम इंडियाचा कोणताही खेळाडू दुबईत ACC अध्यक्षाच्या हातून ट्रॉफी स्वीकारू शकतो. पण टीम इंडियाने आधीच नक्वीच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, आशियाई क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचे हट्ट पाहता भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड हा प्रश्न ICC च्या बैठकीत मांडणार आहे. सूत्रानुसार भारतीय बोर्ड नक्वीच्या सल्ल्याचा स्वीकार करणार नाही.

याआधी, 30 सप्टेंबरला ACC ची बैठक झाली होती, ज्यात BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी मोहसिन नक्वींच्या वागणुकीवर तीव्र विरोध व्यक्त केला होता. राजीव शुक्ला म्हणाले होते की, आशिया कप ट्रॉफी कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही, आणि तिची खरी हकदार टीम इंडिया (Team india) आहे.

अलीकडेच BCCI ने मोहसिन नक्वी यांना ई-मेलद्वारे विनंती केली होती की, टीम इंडियाला ट्रॉफी दिली जावी. यावर भारतीय बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) म्हणाले की, नक्वी यांना यावर उत्तर न दिल्यास, BCCI हा प्रश्न ICC पर्यंत नेणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, BCCI च्या इशाऱ्याला उत्तर देताना नक्वी म्हणाले होते की, ते ट्रॉफी देण्यास तयार आहेत, पण त्यासाठी एका ट्रॉफी प्रेझेंटेशन सेरेमनीची अट ठेवली आहे, ज्यात ते स्वतः भारतीय टीमला ट्रॉफी देतील. पण आता BCCI ने ही मागणी नाकारली आहे. सध्या आशिया कप ट्रॉफी दुबईतील आशियाई क्रिकेट काउंसिलच्या कार्यालयात ठेवलेली आहे.

Comments are closed.