दिवाळीनंतरही फराळ राहील ताजा आणि कुरकुरीत वापरा या टिप्स
दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची झगमग, उत्साह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फराळाचा सुगंध हवेत दरवळत असतो. चकल्या, लाडू, करंज्या, शंकरपाळे, अनारसे अशा स्वादिष्ट पदार्थांशिवाय दिवाळी अपुरीच वाटते. पण या फराळाची खरी मजा त्याचा कुरकुरीतपणा आणि ताजेपणात असते. अनेकदा फराळ काही दिवसांनी ओला पडतो, बुरशी येते किंवा कुरकुरीतपणा कमी होतो. मात्र काही सोप्या घरगुती टिप्स वापरून तुम्ही फराळाला दिवसेंदिवस ताजं आणि कुरकुरीत ठेवू शकता. (how to keep diwali faral fresh and crispy)
1. फराळाचं साहित्य कोरडं ठेवा
फराळ बनवण्यापूर्वी पोहे, रवा, बेसन, खोबरे यांसारखं साहित्य उन्हात एकदा वाळवून घ्या. यामुळे त्यातील ओलसरपणा निघतो आणि पदार्थ जास्त काळ टिकतो.
2. ओल्या हाताने फराळाला स्पर्श करू नका
फराळ बनवत किंवा डब्यात ठेवताना ओला हात लावू नका. ओलसरपणामुळे बुरशी येते आणि पदार्थ लवकर खराब होतात.
3. योग्य तेलाची निवड करा
फराळासाठी वापरलेले तेल चांगल्या प्रतीचे असावे. एकाच तेलात अनेक वेळा तळणं टाळा. चांगलं तेल पदार्थाची टिकवणक्षमता आणि चव दोन्ही वाढवतं.
4. थंड झाल्यानंतरच डब्यात भरा
तळलेले पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यात भरावेत. गरम पदार्थ डब्यात भरल्यास ते नरम पडतात आणि ओलसर होतात.
5. साठवणीसाठी योग्य डबे निवडा
एअरटाइट स्टील किंवा काचेचे डबे वापरा. प्लास्टिकचे डबे टाळा, कारण त्यात फराळाची चव आणि सुगंध बदलतो.
6. वेळोवेळी तपासणी करा
फराळाचा डबा वेळोवेळी उघडून तपासा. ओलसरपणा जाणवला तर पदार्थ थोडावेळ उन्हात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फराळ काढताना नेहमी कोरड्या हातानेच घ्या.
या छोट्या पण प्रभावी टिप्स वापरल्यास तुमचा फराळ दिवाळीनंतरही ताजा, सुगंधी आणि कुरकुरीत राहील. आणि प्रत्येकवेळी खाताना आत्ताच केलेला असा ताजेपणा जाणवेल.
Comments are closed.