Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा सर्व अपडेट्स…

Maharashtra Live Updates: महाविकास आघाडीत नव्या भिडूवरुन रणकंदन सुरु असतानाच आता भाई जगतापांच्या बॉम्बमुळे आता नवा ट्विस्ट आलाय. मुंबईत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भाई जगतापांनी केलंय. मुंबईत मनसे आणि शिवसेनेसह लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाई जगतापांच्या या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचसोबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.