ट्रम्प-पुतिन बैठक रद्द झाल्यानंतर अमेरिकेचा रशियाला धक्का, दोन खनिज तेल कंपन्यांवर घातले निर्बंध

गेल्या चार वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये एक बैठक झाली होती आणि दुसरी बैठक बुडापेस्टमध्ये होणार होती. मात्र ही बैठक अचानक रद्द झाली आहे. त्यानंतर आता अमेरिकेने मोठे पाऊल उचलत रशियाच्या दोन सर्वात मोठ्या खनिज तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष मिटवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
यूएस ट्रेझरीने प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध, मॉस्कोला ताबडतोब युद्धविरामास सहमती देण्याचे आवाहन pic.twitter.com/yYsPag65d7
– व्हाईट हाऊस (@व्हाइटहाउस) 22 ऑक्टोबर 2025
Comments are closed.