‘गुलशन कुमारांच्या हत्येचा मास्टरमाईंड’; बड्या वकिलाचा दावा, दिग्गज गायिकांचं नाव घेत म्हणाले..
उज्वल निकम गुलशन कुमार हत्येप्रकरणी बॉलिवूडला (Bollywood News) हादरवणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या हत्याकांडाबाबत दिग्गज वकील उज्ज्वल निकम (Ujawal Nikam) यांनी खळबळजनक दावा केला आहे. तसेच, या प्रकरणात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. 1997 मध्ये, जेव्हा टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या झाली, तेव्हा बॉलिवूड हादरलेलं. त्यावेळी, बॉलिवूडचे अंडरवर्ल्ड गुन्हेगारांशी संबंध (Bollywood’s Links With Underworld Criminals) असल्याच्या बातम्या समोर येत होत्या, पण रस्त्याच्या मधोमध एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची हत्या होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा संगीतकार जोडीतील (नदीम-श्रवण) नदीम सैफी (Nadeem Saifi) हा कट रचणाऱ्यांपैकी एक म्हणून समोर आला. त्यानंतर लवकरच नदीम देश सोडून पळून गेला.
शुभंकर मिश्रा यांच्या मुलाखतीत बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुलशन कुमार मर्डर केसबद्दल बोलताना खळबळजनक दावा केला. त्यांनी दावा केला की, नदीम हा गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटाचा ‘मास्टरमाइंड’ होता. गुलशन कुमार यांची हत्या का करण्यात आली? असं विचारल्यावर, उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, हे त्या काळातील सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्यातील कथित शत्रुत्वाशी संबंधित असू शकतं.
नदीम गुलशन कुमारांच्या हत्येचा मास्टरमाइंड
उज्ज्वल निकम म्हणाले की, “हो, तो (गुलशन कुमारच्या हत्येत) सामील होता. म्हणूनच तो परत येत नाही… त्याच्यावर खटला चालत नाहीये. नाहीतर, त्याला खटल्याला सामोरं का जावं लागलं नसतं?” नदीम अनेक वर्षांपासून यूकेमध्ये राहत होता आणि आता दुबईमध्ये राहतो. काही वर्षांपूर्वी, नदीम म्हणाला की, तो परत येऊ इच्छितो… याबद्दल उज्ज्वल निकम म्हणाले, “त्यानं परत येण्याची ऑफर दिली आणि मी म्हटले, ‘नक्कीच, परत ये आणि खटल्याला सामोरं जा…” तो येऊ इच्छित नाही. जेव्हा आम्ही त्याला लंडनहून सरेंडर करण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा आम्ही त्याच्याशी बोललेलो…”
गुलशन कुमार यांनी हत्या झालीच का? उज्ज्वल निकम म्हणाले…
गुलशन कुमार यांची हत्या का करण्यात आली? याबाबत बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, “ही एक वेगळीच गोष्ट आहे… अनुराधा पौडवाल ही त्यांची (गुलशन कुमारची) गायिका होती, अलका याज्ञिक ही नदीम-श्रवणची गायिका होती… बस्स…” उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, “पोलिसांचं म्हणणं आहे की, नदीमनं हा कट रचलेला…” नदीमच्या आदेशावरूनच हत्येचा कट रचण्यात आला होता आणि दुबईमध्ये हा कट रचण्यात आला होता.
निर्दोष असल्याचा सातत्यानं दावा केला, पण भारतात आला नाही…
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात नदीम सैफी ब्रिटनला गेल्यानंतर, अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्याच्यासोबत काम करणं सुरूच ठेवलेलं. गुलशन कुमार यांच्या हत्येपासून नदीमनं सातत्यानं आपण निर्दोष असल्याचा दावा करत राहिला, पण तो कधीच भारतात परतला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.