Diwali Bhaubeej 2025 : भाऊबीजेला मंगल औक्षण का करतात?
दिवाळीच्या महत्वाच्या दिवसातील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाचे मंगल औक्षण करण्याची प्राचीन परंपरा आहे. मुख्य म्हणजे, या परंपरेमागे अनेक कारणे आहेत. ज्यात धार्मिक, भावनिक आणि सकारात्मक कारणांचा समावेश आहे. याविषयी जाणून घेऊया. (Diwali Bhaubeej 2025 Why does Mangal aukshan ritual performes on Bhaidooj)
औक्षण हे बहीण भावाच्या प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक आहे. तसेच हा सण त्यांच्या नात्यातील बंधन अधिक घट्ट करतो. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करून, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो.
शुभ घटना
हिंदू धर्मात वाढदिवस, परदेशगमन किंवा परीक्षेत यश मिळणे यांसारख्या शुभ प्रसंगी औक्षण केले जाते. याचप्रमाणे ‘भाऊबीज’ हा एक शुभ प्रसंग असल्याने या दिवशी मंगल औक्षण केले जाते.
धार्मिक महत्त्व
भाऊबीज हा सण ‘यमद्वितीया’ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बहिणीने भावाला औक्षण केल्याने त्याला अकाली मृत्यूचा धोका टळतो, अशी मान्यता आहे. तसेच, यमद्वितीया दिवशी यमराज आणि यमुना देवीची पूजा केल्याने नरक यातना भोगाव्या लागत नाहीत. तसेच जाणून- बुजून झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते.
सकारात्मक कारण
मंगल औक्षण करणे अर्थात त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख- समृद्धी आणि भरभराट यावी अशी प्रार्थना करणे. त्यामुळे भाऊबीजदिवशी बहीण भावाला मंगल औक्षण करून त्याच्या जीवनात सुख-समृद्धी, समाधान येण्याची कामना करते. याशिवाय भाऊबीजेला सायंकाळी 4 वातींचा दिवा लावल्याने आणि दिपदान केल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता नांदते.
नात्यातील प्रेम आणि गोडवा
भाऊबीज केवळ सण नसून एक परंपरा आहे. जी बहीण – भावाच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. असेही म्हणतात की, औक्षण केल्याने त्यांचे नाते दृढ होते.
हेही वाचा –
Bhaidooj Gift Ideas : भावा-बहिणीला भाऊबीजेला द्या हे युनिक गिफ्ट्स
Comments are closed.