भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचं लक्ष्य; शुभमन गिल, विराट कोहली फ्लॉप, रोहित शर्माचा ‘हिट’शो
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs Aus 2nd ODI) भारताने 265 धावांचं आव्हान दिलं आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला, तर त्याच षटाकांत विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर बाद झाला. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला.
इनिंग ब्रेक!
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात ११८ धावांची भागीदारी झाली #TeamIndia एकूण २६४/९ पर्यंत.
स्कोअरकार्ड – https://t.co/q4oFmXx6kr #TeamIndia #AUSWIN #2NDODI pic.twitter.com/o5dN2FGhtA
— BCCI (@BCCI) 23 ऑक्टोबर 2025
भारताकडून शुभमन गिलने 9, रोहित शर्मा 73, विराट कोहली 0, श्रेयस अय्यर 61, अक्षर पटेल 44, केएल राहुल 11, वॉशिंग्टन सुंदर 12, नितीश कुमार रेड्डी 8, हर्षित राणा 24, अर्शदीप सिंगने 13 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावल्या. तर जेवियर बार्टलेट 3 विकेट्स आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या सामन्यासाठी भारताची Playing XI: (Team India Playing XI)
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर
दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची Playing XI: (Australia Playing XI)
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅट रेशॉन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेझलवूड.
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad)
रोहित शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन),विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव , वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, धृव जुरेल.
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ- (Australia Full Squad)
मिशेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस, मिशेल ओन, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅट रेनशॉ, एडम झम्पा, बेनड्वारशुइस
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.