उन्हामुळे काळी पडलेली त्वचा पुन्हा एकदा उजळण्यासाठी, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी हे घरगुती उपाय प्रभावी ठरतील.

हवामानातील सततच्या बदलांचा जसा परिणाम आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम चेहऱ्यावरही लगेच दिसून येतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जास्त बाहेरच्या हालचालींमुळे त्वचा टॅन होते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढल्याने त्वचा निस्तेज आणि काळी दिसते.सोबत चेहरा मान, हात खूप काळे होतात. याशिवाय काही वेळा सनस्क्रीन लावल्यानेही त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या उन्हात जाणे टाळा. चेहऱ्यावरील अतिरिक्त टॅनिंग आणि काळे डाग दूर करण्यासाठी महिला सतत काहीतरी करत असतात. पण तरीही चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होत नाही.(छायाचित्र सौजन्य – istock)
सतत थंडीत ओठ फाटतात? मग बीट्स वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा, ओठांवर जादू दिसेल
चेहऱ्यावर टॅनिंग होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी त्वचा मेलेनिन तयार करते, ज्यामुळे चेहरा काळवंडतो. यामुळे त्वचा काळवंडते, पण कालांतराने त्वचेचा रंग पुन्हा उजळतो. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील अतिरिक्त टॅनिंग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅनिंग पूर्णपणे कमी होईल आणि त्वचा उजळ होईल. त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील.
चेहऱ्याची टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय:
टॅनिंग कमी करण्यासाठी लेमन हनी फेस पॅक वापरा. सर्वात आधी फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या आणि त्यात मध मिसळा. तयार मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते सर्व चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर हाताला पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होऊन त्वचा उजळ होईल. नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. मधाच्या वापरामुळे त्वचा उजळते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.
केसांची काळजी घेण्याच्या टिप्स: 20 रुपयांचे 'हे' उत्पादन तुम्हाला सुंदर काळे केस देईल, दिवाळीत पार्लरमध्ये जाण्याचा खर्च वाचवेल
बेसन दही फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दही आणि बेसन पीठ घ्या आणि एकत्र मिक्स करा. तयार केलेला फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि थोडा वेळ ठेवा आणि नंतर हळूवारपणे तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होईल आणि टॅनिंगपासूनही सुटका मिळेल. फेस पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटं राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि तेजस्वी दिसेल.
Comments are closed.