सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार भाव कधी मिळणार? काँग्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

भाजपच्या उक्ती आणि कृती मधील फरक आहे अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार भाव कधी मिळणार? असा सवालही सावंत यांनी विचारला आहे.
एक्सवर पोस्ट करून सचिन सावंत म्हणाले की, मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनला 5 3 2 8 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. 2 0 1 3 ला प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला 60 0 0 प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला 1 2 वर्षे आणि मोदी सरकारला 1 1 वर्षे झाली. फडणवीस साहेब ६0 0 0 भाव तरी कधी मिळणार? 2 0 47 साली विकसित महाराष्ट्राचे स्वप्न दाखवताना बळीराजाचा तुमच्या राज्यात आदीयुगाकडे उलटा प्रवास सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. भाजपाच्या उक्ती आणि कृती मधील हा फरक आहे.
तसेच आज बाजारात शेतकरी 3 5 0 0 प्रति क्विंटल भावाला सोयाबीन विकत आहे. अर्थात प्रतिक्विटल 1 8 0 0 ते 2 0 0 0 शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे. तुमचे हमीभाव केंद्र सुरू झाले नाहीत. त्यात जाणिवपूर्वक दिरंगाई होत आहे. गंभीर बाब म्हणजे खरेदी केंद्र वाटपात यावेळी अधिकार वाटण्या करून नवा घोळ घालण्यात आला आहे. पूर्वी पणन महासंघाकडे अधिकार होते आता नवीन वाटेकरी आणला आहे. हा घोळ मिटून केंद्र सुरू होण्यास अधिक विलंब लागणार आहे. मूग उडीद अतिवृष्टीने जवळपास पूर्ण गेले. सोयाबीनचे उत्पादन घटून कमी भावामुळे हाती काहीच पडत नाही. अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारी मदत दिवाळीपूवी देऊ म्हणून कोरड्या घोषणा केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्राकडून खरेदी सुरू व्हायची. शेतकरी अडचणीत आहे हे पाहून हमीभाव केंद्र महिनाभर अगोदर सुरू झाली पाहिजे होती. सोयाबीनची बाजारात आवक सुरू होऊन आता महिना होईल तरी सरकार ढिम्म बसून आहे. खरीपाचे उत्पादन बुडाल्याने भाव वाढले पाहिजेत पण कमी होत आहेत. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हात वर करत आहे. भाजपाच्या दृष्टीने निवडणूका व सत्ताच सर्वस्व आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माणूस म्हणून तुम्ही पाहत नाहीत निदान मतदार म्हणून तरी मदत करा असेही सचिन सावंत म्हणाले.
Comments are closed.