IND W Vs NZ W – टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाची हजेरी, सामना थांबला

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ICC Women’s World Cup 2025 मधील 24वा सामना नवी मुंबईतील डि वाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून 48 षटकांचा खेळ झाला असून टीम इंडियाने 329 धावांचा डोंगर उभा केला आहे. मात्र, टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना थांबला आहे. सध्या जेमिमा रॉड्रिग्ज (69) आणि हरमनप्रित कौर (10) नाबाद फलंदाजी करत आहेत.

Comments are closed.