भारताचा विजयी झंझावात! मंधाना आणि प्रतिकाची अफलातून खेळी न्यूझीलंडवर भारी, थेट उपांत्य फेरी गाठ
IND vs NZ पूर्ण हायलाइट्स: भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. गुरुवारी (23 ऑक्टोबर) डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर DLS पद्धतीनुसार 53 धावांनी विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या शतकांमुळे भारताने विजय निश्चित केला.
प्रतिका रावलने 134 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या, तर स्मृती मानधनाने 95 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावा ठोकल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 201 चेंडूंमध्ये 212 धावांची भक्कम भागीदारी केली, ज्यामुळे भारताने 340 धावांचा डोंगर उभारला.
एक करा किंवा मरा सामना, आणि @mandhana_smriti क्लच मध्ये आला आहे! 👑
👉 14वी WODI 💯 – एकंदरीत दुसरी
👉 CWC 2025 मध्ये भारतासाठी पहिले 💯
👉 5वी WODI 💯 2025 मध्ये – एका कॅलेंडर वर्षात संयुक्त-सर्वाधिकथेट क्रिया पहा ➡ https://t.co/Z4aAqmFCEF#CWC25 👉 #INDvNZ | लाइव्ह नाऊ स्टार वर… pic.twitter.com/ZBgVJBihSd
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 23 ऑक्टोबर 2025
पावसाचा व्यत्यय, पण भारताची आघाडी कायम
सामन्यादरम्यान पावसाने अडथळा आणला, त्यामुळे भारताला 49 षटकांचीच फलंदाजी करता आली. त्यानंतर DLS नियमांनुसार न्यूझीलंडसमोर 44 षटकांत 325 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, कीवी संघ 44 षटकांत 8 गडी गमावून फक्त 271 धावांपर्यंतच पोहोचू शकला.
न्यूझीलंडकडून ब्रुक हॉलिडेने 84 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या, तर इसाबेला गेजने 51 चेंडूंमध्ये 10 चौकारांसह नाबाद 65 धावा झळकावल्या. मात्र, त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. भारताकडून रेणुका सिंह ठाकूर आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
📸📸
गोड विजयाचे खास क्षण! 🥳#TeamIndia न्यूझीलंडवर 5️⃣3️⃣ धावांनी (DLS पद्धत) विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करा 💪
स्कोअरकार्ड ▶ https://t.co/AuCzj0Wtc3#WomenInblue | #CWC25 | #INDvNZ pic.twitter.com/qGrCieRLj8
— BCCI महिला (@BCCIWomen) 23 ऑक्टोबर 2025
सलग तीन पराभवानंतर भारताचा पुनरागमन विजय
या सामन्यापूर्वी भारताला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, श्रीलंका आणि पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा हा विजय भारतासाठी निर्णायक ठरला. या विजयामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेतून बाद होण्याचा धोका टाळला आहे. भारताचा शेवटचा लीग सामना 26 ऑक्टोबर रोजी बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.
उपांत्य फेरीतील शेवटचा तिकीट भारताच्या नावावर
भारत हा उपांत्य फेरी गाठणारा चौथा आणि शेवटचा संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी नॉकआउट फेरीत प्रवेश मिळवला होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.