करण यादव यांची अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत सरकारने अत्यंत साहसी पाऊल उचलत काबूलमध्ये स्वत:च्या राजनयिक दूतावासाला पुन्हा स्थापित केले आहे. भारतीय विदेश सेवेचे अधिकारी करण यादव यांना काबूलमधील भारतीय मिशनचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तान वर तालिबानने कब्जा केल्यावर भारताने औपचरिक संबंध स्थापन करण्यात आल्याचे प्रतीक म्हणजे ही नियुक्ती आहे.  तालिबानचे विदेशमंत्री अमीर खान मुत्तकी याच्या दौऱ्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी भारताचे एक टेक्निकल मिशन काबूलमध्ये तैनात होते. करण यादव 18 महिन्यांपासून काबूलमध्ये टेक्निकल मिशनचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. काबूलमधील भारतीय दूतावासात 10-12 कर्मचारी आणि अधिकारी सद्यकाळात तैनात आहेत.

अफगाणिस्तानातील चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दूतावास पुन्हा सुरू करण्याला अफगाणिस्तानच्या विकास आणि पुनउ&भारणी प्रयत्नांमध्ये एक स्थिर सहकाऱ्याच्या स्वरुपात भारताच्या पारंपरिक भूमिकेला परत मिळविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जातेय. तालिबानची राजवट येण्यापूर्वी भारताने अफगाणिस्तानात अनेक  प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली होती. भारताने हे प्रकल्प पूर्ण करावेत अशी तालिबानची इच्छा आहे. भारताने अद्याप तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. पूर्ण राजनयिक मिशन एक व्यवहार्य संतुलन निर्माण करणार असून ते भारताचे हितसंबंध आणि मानवीय प्रकल्पांचे रक्षण करत तालिबानच्या राजवटीवरून जागतिक भागीदारांच्या संपर्कात राहिल.  भारताने तेथे 22 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.

Comments are closed.