भारताने ट्रम्प यांचा नवा दावा फेटाळला
भारत रशियन तेलखरेदी कमी करणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत चालू वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणाऱ्या कच्चे तेल आयातीत जवळपास 40 टक्क्यांची कपात करणार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भारताने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन कच्चे तेल आयात रोखण्याचे कुठलेच आश्वासन दिले नव्हते असे भारताने स्पष्ट केले आहे. रशियन कच्च्या तेलाची आयात बंद करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे भारताने मला सांगितले आहे. ही एक प्रक्रिया असून ती अचानक बंद करता येत नाही. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारत रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात जवळपास शून्य करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली चर्चा अत्यंत सार्थक राहिली असून भारत आकर्षक देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय हित सर्वोपरि
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात रोखण्याचे कुठलेच आश्वासन दिलेले नाही. आमच्या ऊर्जा धोरणाचे मुख्य लक्ष्य देशाच्या ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणे आहे. स्थिर किमती आणि सुरक्षित पुरवठ्याला आम्ही प्राथमिकता देतो आणि आमचा ऊर्जास्रोत निवडण्याचा निर्णय आमच्या राष्ट्रीय हितांद्वारे निर्देशित असतो असे भारताने स्पष्ट केले आहे.
टॅरिफचा मुद्दा अन् पाकिस्तानशी संबंध
ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयातशुल्क लादले आहे. तसेच कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रशियाऐवजी अन्य ऊर्जा स्रोत शोधण्याचा आग्रह ट्रम्प यांनी केला आहे. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात जारी ठेवली तर त्याला मोठे आयातशुल्क भरत रहावे लागणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या निर्बंधांमुळे तणाव
ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे भारत-अमेरिका व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने अलिकडच्या वर्षांमध्ये रशियाकडून 40 टक्के कच्च्या तेलाची खरेदी केली होती. यामुळे भारत हा रशियाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. परंतु आता ट्रम्प प्रशासनाच्या दबावामुळे व्यापारविषयक चर्चा संकटात सापडली आहे. अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे भारतीय निर्यातीला मोठा फटका बसला आहे.
Comments are closed.