साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 26 ऑक्टोबर 2025 ते शनिवार 1 नोव्हेंबर 2025
>> नीलिमा प्रधान
जाळी – उतावळेपणा नको
मेषेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. महत्त्वाची, कठीण कामे करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना मदत कराल. धंद्यात उतावळेपणा नको. प्रकृतीची काळजी घ्या. प्रत्येक दिवस जिद्दीने यश मिळेल. व्यवहारात सावध रहा. शुभ दि. 28, 30
वृषभ – वाहन जपून चालवा
वृषभेच्या सप्तमेषात मंगळ, चंद्र बुध लाभयोग. वरिष्ठांना कमी लेखू नका. दुसर्यांचे चांगले, वाईट अनुभव लक्षात ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत कटकटी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील मात्र संयम बाळगा. शुभ दिवस. 29, 30
मिथुन – वाद वाढवू नका
मिथुनेच्या षष्ठेशात मंगळ, चंद्र गुरू प्रतियुती. नात्यात, मैत्रीत व कार्यक्षेत्रात संभाषणात चूक करू नका. वाद वाढवू नका. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनेवर लक्ष द्या. शुभ दिवस. २७, २८
कर्करोग – कर्जाचे काम करा
कर्केच्या पंचमेषात मंगळ, चंद्र गुरू प्रतियुती. दगदग होईल. शारीरिक, मानसिक तणाव जाणवेल. क्षुल्लक अडचणीवर मात करा. धंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होतील. शुभ दिवस. 29, 30
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
सिंहेच्या सुखस्थानात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. संताप देणारी घटना घडेल. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू नीट सांभाळा. धंद्यात बदलाची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुना वाद नव्याने निर्माण होईल. शुभ दिवस. २७, २८
कन्या – प्रगतीचा आलेख उंचावेल
कन्येच्या पराक्रमात मंगळ, चंद्र बुध लाभ योग. क्षेत्र कोणतेही असो प्रगतीचा आलेख उंचावेल. नोकरीत लाभ होईल. धंद्यात वाढ होईल. कर्ज मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. प्रभावी मुद्यांमुळे वरिष्ठ खूष होतील. शुभ दिवस. 29, 30
तूळ – मैत्रीत सावध रहा
तुळेच्या धनेषात मंगळ, चंद्र बुध लाभयोग. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर केलेला निश्चय योग्य ठरेल. त्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत बदल शक्य. मैत्रीत सावध रहा. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर नजर ठेवा. शुभ दिवस. २६, २८
वृश्चिक – प्रत्येक दिवस उत्साहाचा
स्वराशीत मंगळ, चंद्र गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस उत्साहाचा व प्रेरणादायक ठरेल. अहंमपणाची भावना दूर ठेवा. नोकरीच्या कामात सावध रहा. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. शुभ दिवस. 28, 30
धनु – व्यवहारात सतर्क रहा
धनुच्या व्ययेषात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. नविन परिचय होतील. वागण्याबोलण्यात सावध रहा. व्यवहारात सतर्क रहा. नोकरीत तत्परता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धोका पत्करू नका. शुभ दिवस. 30, 31
मकर – नोकरीत लाभ होईल
मकरेच्या एकदशात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोणयोग, सप्ताहाच्या सुरूवातीला समस्या निर्माण होईल. जिद्दीने मेहनत करा. तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. नोकरीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढवता येईल. शुभ दिवस. ३१, १
कुंभ – मानसिक दडपण राहील
कुंभेच्या दशमेषात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. मानसिक, शारीरिक दडपण राहील. प्रकृतीची काळजी घ्या. सहकारीवर्गाला दुखवू नका. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप, टिका होईल. शुभ दिवस. २६, २८
मीन – नियमांचे पालन करा
मीनेच्या भाग्येषात मंगळ, चंद्र बुध लाभयोग. सरकारी कामात नियमांचे पालन करा. वाद, तणाव वाढवू नका. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. धंद्यात यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धोका पत्करू नका. शुभ दिवस. २६, २८
Comments are closed.