मी चुकलो, तुम्ही चुकू नका! नाशिक पोलिसांच्या दणक्यानंतर शिंदे गटाच्या फरार नेत्याचा माफीनामा; म
नाशिक गुन्हे: नाशिकमध्ये पोलिसांनी (Nashik Police) अलीकडेच राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवर आणि कायदा मोडणाऱ्या नेत्यांवरही कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत विनापरवानगी फलक लावल्याच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते विक्रम नागरे (Vikram Nagare) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे फलक नागरे यांचे समर्थकांनी नाशिक शहरात परवानगीशिवाय लावले होते. त्या फलकांवर नागरे यांचा फोटो होता आणि त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विक्रम नागरे फरार झाले होते. आता मात्र त्यांनी एक व्हिडीओ जारी करत नाशिक पोलिसांची माफी मागितली आहे.
Vikram Nagare: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला : विक्रम नागरे
विक्रम नागरे म्हणाले की, वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावण्यात आले होते. त्यात माझा देखील फोटो होता. त्यावेळेस मी नाशिकमध्ये नसून बाहेरगावी होतो. पण शहर विद्रुपीकरण जो काही गुन्हा दाखल झालेला आहे. त्या संदर्भात मी दंड भरेल. नाशिक महापालिका, नाशिक शहर पोलीस, सिंघम कमिशनर संदीप कर्णिक साहेब यांची मी माफी मागतो. मी चुकलो, तुम्ही चुकू नका. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, असे म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.
Nashik Police: पोलिसांकडून ‘ऑटो शिस्त मोहीम’
दरम्यान, नाशिकमध्ये पोलिसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन क्लीनअप” मोहिमेनंतर आता शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवरही पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीसोबतच रिक्षाचालकांची मुजोरी, वाहतुकीतील शिस्तभंग आणि प्रवाशांवरील अरेरावी वाढत असल्याने पोलिसांनी “ऑटो शिस्त मोहीम” हाती घेतली आहे.
Nashik Police: बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई होणार
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार या मोहिमेत नियमबाह्य, परवान्याशिवाय आणि गणवेशाशिवाय रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. रिक्षा चालकांकडे गणवेश, बॅच, वैध परवाना आणि रिक्षाची आवश्यक कागदपत्रे नसल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडून धोकादायकरीत्या रिक्षा चालवणे किंवा प्रवाशांशी अरेरावी करणे हे गुन्हा मानले जाणार असून, संबंधित चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.