दशावतार आता मल्याळम भाषा

कोकणच्या मातीतील कलेच्या माध्यमातून तेथील व्यथा प्रभावीपणे मांडणारा ’दशावतार’ हा सिनेमा आता मल्याळी भाषेतही झळकणार आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयामुळे महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरलेला हा सिनेमा गेल्या 50 दिवसांपासून तुफान गर्दी खेचत आहे. त्यामुळे मल्याळी प्रेक्षक त्यास कसा प्रतिसाद देतात याबद्दल उत्सुकता आहे.

‘दशावतार’ हा चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला. समीक्षकांनी या चित्रपटाच्या आशय-विषयाचे भरभरून काwतुक केले. महाराष्ट्रासोबतच मराठी भाषिकांची मोठी संख्या असलेल्या बडोदा, इंदूर, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि गुवाहाटीतही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाबद्दल इतर भाषिक प्रेक्षकांमध्येही मोठं कुतूहल निर्माण झालं. त्यामुळेच केरळमधील प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तो आता मल्याळी भाषेतूनही प्रदर्शित होणार आहे.

कोण पेलणार शिवधनुष्य?

अलीकडेच दशावतारचे ‘मल्याळी’ भाषेतील पोस्टर प्रदर्शित झाले. येत्या 21 नोव्हेंबर रोजी ‘दशावतार’ केरळमध्ये प्रदर्शित होणार आहे. वरुण गुप्ता यांच्या मॅक्स मार्पेटिंग संस्थेने हा चित्रपट मल्याळी भाषेत सादर करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. मराठी चित्रपट मल्याळी भाषेतून केरळमध्ये प्रदर्शित होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. कथा व मांडणी उत्तम असल्यास मराठी चित्रपट मोठी झेप घेऊ शकतो हेच यातून सिद्ध झाले आहे.

Comments are closed.