Gel Nail Polish: जेल नेल पॉलिशचा नवा फॅशन ट्रेंड; जाणून घ्या सर्व काही
आजकाल महिला आपल्या नखांची विशेष काळजी घेत असतात. कोणत्याही चांगल्या प्रसंगाच्या वेळी महिलांचा हमखास नेल आर्टकडे कल असतो. अशातच जेल नेल पॉलिशचा ट्रेंडही वाढत आहे. यामुळे नखे अधिक आकर्षक दितात शिवायचे नेल पोलिश दीर्घकाळ टिकते. चला तर मग जाणून घेऊया जेल नेल पॉलिश कसे असायचे आणि त्याचे फायदे काय आहेत? ( Gel Nail Polish New Beauty Trend )
जेल नेल पॉलिश म्हणजे काय?
जेल नेल पॉलिश हे सामान्य नेल पॉलिशप्रमाणे हवेमुळे सुकत नाही तर तर ते यूव्ही किंवा एलईडीच्या माध्यमातून सेट करतात. यामुळे नखे अधिक आकर्षक, चमकदार दिसतात आणि दोन ते तीन आठवडे हे सहज टिकते. यामुळे नेल पॉलिश वारंवार बदलण्याची गरज नसते.
जेल नेल पॉलिशचे फायदे आणि दुष्परिणाम
- सामान्य नेल पॉलिश हवेत सुकते, तर जेल पॉलिश यूव्ही किंवा एलईडी लाईटने सेट केले जाते.
- सामान्य नेल पॉलिश २-३ दिवसांत निघते, पण जेल पॉलिश २-३ आठवडे टिकते.
- सामान्य नेल पॉलिशपेक्षा हे थोडं जाड असते यामुळे नखे तुटण्याचा धोका कमी होतो.
- यूव्ही किंवा एलईडी लाईटमुळे त्वचेवर टॅनिंग किंवा वृद्धत्वाची लक्षणे वाढू शकतात.
- काहींना ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे हे लावण्यापूर्वी हातांना सनस्क्रीन लावा.
जेल नेल पॉलिश लावण्याची पद्धत
- सर्वात आधी नखे स्वच्छ आणि ट्रिम केले जातात.
- पॉलिश टिकून राहण्यासाठी नखांवर बेस कोट लावला जातो.
- जेल नेल पॉलिशचे २-३ थर लावले जातात.
- प्रत्येकवेळी यूव्ही किंवा एलईडी लाईटखाली नेल पॉलिश सुकवले जाते.
- शेवटी एक चमकदार टॉप कोट लावला जातो.
Comments are closed.