विराट-रोहित नव्हे, पण गिल आणि गंभीरचं 2027 विश्वचषकातलं स्थान धोक्यात? जाणून घ्या सविस्तर
ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 असा पराभव करत वनडे मालिका जिंकली आहे. पहिल्या दोन सामने कांगारू संघाने जिंकले, तर सिडनीत झालेला तिसरा सामना भारताने 9 गडी राखून जिंकला.
या मालिकेच्या आधी आणि मालिकेदरम्यानही रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) 2027 च्या विश्वचषकात खेळतील का? यावर चर्चा सुरू होती. याच दरम्यान एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये डेविड वॉर्नरच्या (David Warner) नावाने दावा केला जात आहे की, 2027 च्या विश्वचषकात शुबमन गिल आणि गौतम गंभीर (Shubman gill & Gautam Gambhir) यांची जागा संघात सुरक्षित दिसत नाही
व्हायरल पोस्टनुसार, वॉर्नरने म्हटले आहे की, मला रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा 2027 च्या विश्वचषकात शुबमन गिल आणि गौतम गंभीर यांच्या जागेबाबत जास्त शंका वाटते.
सोशल मीडियावर हे वक्तव्य वॉर्नरच्या नावाने झपाट्याने पसरत आहे, पण वॉर्नरने खरंच कमेंट्रीदरम्यान हे विधान केलं आहे का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेमध्ये विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. प्रचंड दबावाखाली असताना त्याने सिडनीमध्ये नाबाद 74 धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या बाजूला, रोहित शर्मा 202 धावा करून मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सिडनीत नाबाद 121 आणि ॲडिलेडमध्ये 73 धावांची खेळी केली होती.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आधीच टी20 आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळतात. भारताची पुढील वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, ही मालिका 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
या मालिकेत रोहित आणि विराट दोघेही खेळताना दिसतील, अशी शक्यता आहे.
Comments are closed.