पहिल्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल! बुमराह- चक्रवर्तीचा समावेश, 8 खेळाडू बाहेर

वनडे मालिकेत पराभव केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) ऑस्ट्रेलियावर बदला घेण्यासाठी टी20 मालिकेत मैदानावर उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांची टी20 मालिका 29 ऑक्टोबर रोजी, बुधवारी, कॅनबरा येथे सुरू होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1:45 वाजता होईल. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंसोबत मैदानावर उतरेल ते पाहूया.

वनडे मालिकेशी तुलना केल्यास या टी20 सामन्यासाठी 8 खेळाडू संघाबाहेर राहतील. यामध्ये स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी20 मालिकेत खेळताना दिसेल. तसेच मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करेल. टी20चा नंबर-1 फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) देखील सामन्यात दिसणार आहे.

8 खेळाडू जे पहिल्या टी20 सामन्यात संघाचा भाग राहणार नाहीत, त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, नितीश कुमार रेड्डी, केएल राहुल, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. यात नितीश आणि कुलदीप टी20 संघाचा भाग असले तरी त्यांचं पहिल्या टी20मध्ये खेळणे शक्य नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी20मध्ये भारतासाठी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल (Abhishek Sharma & Shubman gill) संघाची पारी सुरू करतील. त्यानंतर नंबर 3 वर कर्णधार सूर्यकुमार यादव खेळेल. नंबर 4 वर तिलक वर्मा खेळताना दिसेल. गेल्या 1 ते 1.5 वर्षांत तिलकने या फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 2025 आशिया कपच्या फायनलमध्येही त्याने टीम इंडियाला (Team india) विजय मिळवून दिला होता.

पहिल्या टी20मध्ये नंबर 5 वर विकेटकीपर संजू सॅमसन (Sanju Samson) खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 अष्टपैलू मैदानावर दिसतील, ज्यात शिवम दुबे आणि अक्षर पटेल (Shivam Dube & Axar Patel) प्रमुख दावेदार आहेत. नंबर आठवर हर्षित राणा (Harshit Rana) खेळू शकतो. तो वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीतूनही टीमसाठी महत्वाच्या धावा करू शकतो. त्यानंतर वरुण चक्रवर्ती मुख्य फिरकीपटू असेल. उरलेल्या 2 वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah & Arshdeep singh) आणि अर्शदीप सिंग मैदानावर दिसू शकतात.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी20साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

भारत-ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचे टी20 मालिका वेळापत्रक:

पहिला टी20: 29 ऑक्टोबर – कॅनबरा – दुपारी 1:45 वाजता

दुसरा टी20: 31 ऑक्टोबर – मेलबर्न – दुपारी 1:45 वाजता

तिसरा टी20: 2 नोव्हेंबर – होबार्ट – दुपारी 1:45 वाजता

चौथा टी20: 6 नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट – दुपारी 1:45 वाजता

पाचवा टी20: 8 नोव्हेंबर – गाबा – दुपारी 1:45 वाजता

Comments are closed.