थायलंड-कंबोडिया युद्धबंदी, ट्रम्प यांची करारावर स्वाक्षरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मिशन युद्धबंदी सुरूच आहे. आशिया दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांनी आज थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केलीय. त्याचबरोबर त्यांनी अनेक व्यापार करारांचीही घोषणा केली.
क्वालालंपूर येथे झालेल्या असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान) शिखर परिषदेला ट्रम्प यांनी हजेरी लावली. त्या वेळी मलेशिया, थायलंड आणि कंबोडियाच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली व शांतता करारावर शिक्कामोर्तब केले. यावेळी ट्रम्प म्हणाले, ’हा दिवस खूप खास आहे. या कराराने आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. ज्या दोन देशांमध्ये ही डील झाली आणि ज्या तिसऱ्या देशाने मदत केली, त्या सर्वांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. परस्परांविषयी द्वेष असला की असे करार करणे कठीण असते असा माझा अनुभव आहे. मात्र, थायलंड कंबोडियामध्ये मला तसे दिसले नाही. त्यामुळे हे थोडे सोपे झाले, असे ट्रम्प म्हणाले.

Comments are closed.