यशवंत देव स्मृतिदिन, शुक्रवारी ‘असेन मी नसेन मी’ सांगीतिक मैफल

दिवंगत संगीतकार, गायक यशवंत देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक नाट्यगृह येथे ‘असेन मी, नसेन मी’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन केले आहे. यात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

घाटकोपर येथील हनुमान व्यायाम मंदिर या सामाजिक संस्थेने कार्यक्रम आयोजित केला आहे. मैफलीत गायक-संगीतकार मंदार आपटे, गायिका माधुरी करमरकर, विद्या करलंगीकर, आल्हाद पालेकर हे आपल्या गायकीचा आनंद रसिकांना देतील. रसिकांना प्रवेश विनामूल्य असून मंगळवारी सकाळी 11.30 ते दुपारी 1 या वेळेत सावरकर नाट्यगृह येथे प्रवेशिका उपलब्ध असतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मांजरेकर (संपर्क क्रमांक 8097753578) यांनी दिली.

Comments are closed.