Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोख

Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विशाल गोखले यांनी ⁠जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ई-मेल केलाय. व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय. धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय, तर नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. ⁠जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही गोखले म्हणाले. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.