ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Sch
टीम इंडियाचे पुढील क्रिकेट वेळापत्रक: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने बाजी मारत मालिका जिंकली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक महिन्यांनंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतासाठी एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा मैदानात कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली, जवळजवळ टीम इंडियासाठी खेळत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) असेल.
भारत अन् दक्षिण अफ्रिकेत रंगणार मालिका- (Ind vs SA)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा 3 डिसेंबर रोजी आणि तिसरा 6 डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तथापि, भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे.
भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)
पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
पहिली एकदिवसीय: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
दुसरी एकदिवसीय: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
तिसरी एकदिवसीय: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम)
दुसरा T20: 11 डिसेंबर (PCA स्टेडियम)
तिसरा T20: 14 डिसेंबर (HPCA स्टेडियम)
चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.