प्रवाळ समुद्राला ६.० रिश्टर स्केलचा भूकंप
वानुआतुमध्ये दहशतीत लोक
वृत्तसंस्था/ पोर्ट विला
कोरल समुद्रात रविवारी पहाटे 6.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार पहाटे 4.58 वाजता भूकंपाचा धक्का नोंदविण्यात आला. भूकंपाचे केंद्र केवळ 10 किलोमीटर खोलवर होते. वानुआतुची राजधानी पोर्ट विलापासून भूकंपाचे केंद्र 643 किलोमीटर अंतरावर होते.
भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची जीवित किंवा आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. स्थानिक प्रशासन आणि भूकंप देखरेख यंत्रणा स्थितीवर नजर ठेवून आहेत. पृष्ठभागानजीक घडणारे भूकंप अधिक धोकादायक असतात, कारण त्यांचे धक्के जमिनीपर्यं अधिक शक्तिनिशी पोहोचत असतात, ज्यामुळे इमारतींना नुकसान आणि जीवितहानीचा धोका वाढतो असे तज्ञांचे सांगणे आहे.
इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट प्रशांत प्लेटच्या खाली सरकत असलेल्या क्षेत्रात सोलोमन आणि वानुआतु बेट आहे. हा भाग भूकंपीय रुपात अत्यंत सक्रीय मानला जातो, येथे अनेक मोठे भूकंप होत असतात. हा भाग अनेक छोट्या छोट्या मायक्रोप्लेट्सदरम्यान स्थित आहे, जे मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्सदरम्यान फसलेले आहेत. ऑस्ट्रेलिया खंड दरवर्षी सुमारे 6 सेंटीमीटरने उत्तर-पूर्व दिशेने सरकत आहे. तर काही ठिकाणी हा दर 13 सेंटीमीटर प्रतिवर्षापर्यंत असू शकतो.
मागील वर्षी विध्वंसक भूकंप
मागील वर्षी वानुआतुच्या पोर्ट विलामध्ये 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता, या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक इमारती नष्ट झाल्या होत्या. त्यावेळी डब्ल्यूएचओ आणि युनिसेफने स्थानिक आरोग्य मंत्रालयासोबत मिळून रेडिओ, पोस्टर आणि सामुदायिक अभियानांद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचविल्याने मोठी जीवितहानी टळली होती.
Comments are closed.