Shreyas Iyer Injury : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये, श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना बसला जबरदस्त मार
क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सिडनीतील (Sydney) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे, रिपोर्ट्स आल्यानंतर अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले आणि त्याला तातडीने दाखल करावे लागले’. झेल घेताना श्रेयसच्या बरगड्यांना मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला, त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुखापतीमुळे श्रेयसचे आगामी काही सामन्यांमध्ये खेळणे अनिश्चित मानले जात आहे.
आणखी पाहा
Comments are closed.