रोहित अन् कोहलीने…; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना संपताच गंभीरचं ड्रेसिंग रुममध्ये मोठं विधान, मना
रोहित शर्मा विराट कोहलीवर गौतम गंभीर: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने बाजी मारत मालिका जिंकली.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी माजी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. बीसीसीआयने ड्रेसिंग रुममधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. त्यामुळे रोहित शर्माला सामनावीर तसेच मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे मालिकावीरचा पुरस्कारही देण्यात आला. पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विरोट कोहलीने (Virat Kohli) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 74 धावा केल्या. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेट्ससाठी 168 धावांची भागिदारी झाली. या भागिदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. बीसीसीआयने सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गंभीरला संबोधित करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गंभीरने सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यातील 69 धावांच्या सलामी भागीदारीचे कौतुक केले. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गंभीरने ही भागीदारी महत्त्वाची असल्याचे वर्णन केले. त्यानंतर गंभीरने रोहित आणि कोहली यांच्यातील भागीदारीचंही कौतुक केले.
रोहित शर्मा अन् विराट कोहलीबाबत गौतम गंभीर काय म्हणाला? (Gautam Gambhir On Rohit And Virat)
गंभीर म्हणाला की, फलंदाजीच्या बाबतीत, मला शुभमन आणि रोहितची भागीदारी खूप महत्त्वाची वाटली. त्यानंतर रोहित आणि विराटची भागीदारी देखील उत्कृष्ट होती. रोहितची शतकी कामगिरी अद्भुत होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित आणि कोहलीने सामना संपवला. यशस्वी पाठलाग करताना रोहित आणि कोहली दोघेही नाबाद राहिले याबद्दल गंभीरने आनंद व्यक्त केला. दरम्यान, रोहितला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज पदक देण्यात आले.
गौतम गंभीरकडून हर्षित राणाचं कौतुक- (Gautam Gambhir On Harshit Rana)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 39 धावांत चार विकेट्स घेणाऱ्या हर्षित राणाचेही गंभीरने कौतुक केले. मला वाटते की गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने सुरुवात केली आणि 10 षटकांनंतर न गमावता 63 धावा केल्या. नंतर ऑस्ट्रेलियाला 237 धावांपर्यंत मर्यादित रोखणे ही चांगली कामगिरी होती. हर्षितचा विशेष उल्लेख कारण त्याचा स्पेल उत्कृष्ट होता. मी फक्त एवढेच म्हणू इच्छितो की नम्र राहा, स्थिर राहा आणि कठोर परिश्रम करत राहा. ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही,असं गौतम गंभीरने सांगितले.
एक प्रभावी अष्टपैलू खेळ, मुख्य प्रशिक्षकाच्या प्रेरणादायी शब्दांनी कौतुक केले @गौतम गंभीर 🙌 🗣
🎥 3️⃣ चे प्रतिबिंब #AUSWIN ODI, त्यानंतर 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗦𝗲𝘏 medal𝗦𝗲𝗿 चे सादरीकरण #TeamIndia | @ImRo45…
— BCCI (@BCCI) 27 ऑक्टोबर 2025
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.