गौतम गंभीर यांनी केलं रोहित शर्माचं भरभरून कौतुक, जाणून घ्या विराटबद्दल काय म्हणाले?
सिडनी वनडे सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवीर रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. हिटमॅनसोबत किंग विराट कोहलीनेही तिसऱ्या क्रमांकावर खेळत नाबाद अर्धशतक ठोकले. या दोन्ही दिग्गजांच्या जोरावर टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना 9 विकेटने जिंकला. सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले.
सिडनी वनडे सामन्यानंतर विजयी खेळाडूंवर भाष्य करताना गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये म्हटले, “फलंदाजीत मला असे वाटले की शुबमन आणि रोहित यांच्यातली भागीदारी खूप महत्त्वाची होती. संघाने एकही विकेट न गमावता 60 धावा केल्या होत्या, तेव्हापासूनचा टप्पा निर्णायक ठरला. त्यानंतर रोहित आणि विराट यांच्यातली भागीदारीही अप्रतिम होती आणि आणखी एक शतकी भागीदारी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही (रोहित) सामना संपवला आणि विराटनेही तसंच केले.” या मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
Comments are closed.