अखेर 14 वर्षांचा संसार मोडला! टिव्ही इंडस्ट्रीतले जय भानूशाली आणि माही वीज झाले विभक्त

टिव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर .येत आहे. प्रसिद्ध कपल जय भानूशाली आणि माही वीज यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात आलबेल नसल्याची चर्चा होती मात्र त्या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे. हे दोघं एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. तब्बल 14 वर्षाच्या संसारानंतर हे दोघं वेगळे झाले आहेत.
जय भानूशाली आणि माही वीज यांनी अधिकृतरित्या हे नाते संपवले आहे. त्यांना तीन मुलं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जय आणि माही दोघांमध्ये मतभेद सुरु होते. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही समोर येत होत्या. काही महिन्यांपूर्वी दोघांनी न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आज दोघांनी घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. दोघंही जुलपासून वेगळे राहत होते.

Comments are closed.