कॅचचा थरार जीवावर भारी! श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्वाची बाब समोर
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Team india’s Star player Shreyas iyer) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना अय्यर गंभीर जखमी झाला. ही दुखापत इतकी तीव्र होती की त्याला प्रथम मैदानाबाहेर जावं लागलं आणि नंतर त्वरित रुग्णालयात दाखल करावं लागलं. तपासात अंतर्गत रक्तस्राव (internal bleeding) झाल्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे त्याला ताबडतोब आयसीयूमध्ये हलवण्यात आलं.
बीसीसीआयनेही अय्यरच्या कुटुंबाला सिडनीला बोलावण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्यक्षात, अॅलेक्स केरीचा कॅच घेताना अय्यरचं शरीराचं संतुलन बिघडलं. कॅच पकडताना तो जोरात जमिनीवर आदळला आणि त्याचं पूर्ण शरीराचं वजन छातीवर आलं. त्यामुळे त्याच्या बरकड्यांना जबरदस्त मार लागला आणि तो खूप वेदनादायकरीत्या जखमी झाला.
सध्या डॉक्टरांच्या मते, श्रेयस अय्यरला किमान 5 ते 7 दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे. देशभरातून आणि चाहत्यांकडून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.