उंच इमारती काचेच्या का असतात? वाचा यामागील रंजक कारण
शहरातील इमारती उंचच उंच असतात. दुरून पाहिल्यास या इमारती खूपच आकर्षक दिसतात. विशेष करून ज्या भागात आयटी कंपन्या किंवा कॉर्पोरेट कार्यालये मोठ्या संख्येने आहेत, तेथील इमारतींची रचना खूपच वेगळी आणि आधुनिक असते. या इमारतींबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे त्या काचेच्या असतात. अनेकांना उंच इमारती काचेपासून बनवण्याचे कारण फक्त सौंदर्य असे वाटते. पण, प्रत्यक्षात तसे नाही. उंच इमारतींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काचेचा वापर करण्यामागे अनेक मोठी आणि वेगळी कारणे आहेत, जी अनेकांना माहीत नाहीत. चला जाणून घेऊयात यामागील रंजक कारणे.
विजेची बचत –
उंच इमारतींमध्ये काचेचा वापर करण्यामागे विजेची बचत एक कारण आहे. काच पारदर्शक असते आणि त्यामुळे दिवसा लाइट्सचा वापर कमी होतो.
हेही वाचा – वासरम, बाथरम आणि रेसिअम तुम्हाला का आवडतात? गुलाबाचा वापर केला जात असला तरी 95% लोकसंख्या 95% आहे
तापमान नियंत्रण –
या इमारतींमध्ये सामान्य काच नाही तर एक विशेष प्रकारच्या इन्सुलेटेड काचांचा वापर केलेला असतो. ही काच बाहेरून येणारी उष्णता किंवा थंडी आत येऊ देत नाही, ज्यामुळे एअर कंडिशनर (एसी) किंवा हीटर वापरण्याची गरज कमी होते. यामुळे ऊर्जेची बचत होते.
मजबूत बांधकाम –
आधुनिक काचेच्या टेक्नोलॉजीमुळे काचेपासून बनलेल्या इमारती भूकंप, वादळाला तोंड देण्यासाठी सक्षम असतात. ओलावा आणि हवामानामुळे यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
आगीचा धोका नाही –
इमारत काचेची असल्याने आगीपासून तुम्हाला सुरक्षित ठेवते. जरी काही कारणास्तव आग लागली तरी काचेच्या रचनेमुळे धूर आणि उष्णता लवकर बाहेर पडते. ज्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळतो.
स्वच्छतेचं टेन्शन कमी –
काचेच्या भिंती कमी धूळ आणि घाण जमा करतात. याशिवाय, त्यांना साफ करणं वीट किंवा दगडी भिंतींपेक्षा सोपं जाते. त्यामुळे उंच इमारती काचेच्या असतात.
हेही वाचा – Interesting Facts: केळी असो किंवा अंडी एका डझनात फक्त 12 वस्तूच का असतात? 10, 11 का नाही
Comments are closed.