आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
सातारा : फलटण (Satara) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येने महाराष्ट्र हादरला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून डॉक्टर महिलेनं आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासाबाबत पोलीस (Police) अधीक्षक तुषार दोशी यांनी आज महत्वाचे खुलासे केले आहेत. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देताना, मृत महिला डॉक्टर आणि आरोपी यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होतं, असा खळबळजनक दादा पोलीस अधिक्षकांनी केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला, तो आत्महत्येचा गुन्हा आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत, दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांचा डीवायएसपी यांच्यामार्फत तपास सुरू आहे. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे, यामार्फत आरोपीविरुद्ध काय पुरावे मिळतात याचा तपास सध्या सुरू आहे. सध्या प्राथमिक पीएम रिपोर्ट मिळाले असून फायनल पीएम रिपोर्ट आज किंवा उद्या आम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील. त्यानुसार मयत आणि आरोपी यांचे काही नक्की संबंध होते का हे तपासातून समोर येईल, असे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी म्हटलं. मयत डॉक्टर या ज्यावेळेस हॉटेलमध्ये गेली, त्यावेळेस ती एकटी होती. हे सीसीटीव्हीमध्ये दिसत असून हॉटेलमधील डीव्हीआर आम्ही जप्त केला आहे. डीव्हीआर तपासला असता, कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला आढळून आली नाही. तरीसुद्धा ती हॉटेलवर का गेली या गोष्टींचा पूर्ण तपास करण्यात येईल, अशी माहिती देखील दोषी यांनी दिली.
आरोपी अन् मृत डॉक्टर महिलेचे वारंवार चॅटिंग
या प्रकरणाच्या तपासा संदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निष्पक्षपणे सुरू आहे. सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे. त्याच्यातून असं दिसत आहे की, मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होतं. डॉक्टर महिला ही आरोपींच्या संपर्कामध्ये होती, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.
आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी बदनेच्या शोधासाठी पथके स्थापन केली होती. मात्र, स्वतः हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी शरण येताच रात्री दीड वाजेपर्यंत त्याची कसून चौकशी करत रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवती डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचे व घरमालकाचा मुलाग प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.