श्रेयस अय्यर आयसीयूतून बाहेर, सिडनीत मित्र पोहोचले, कुटुंबीयांकडून तात्काळ व्हिसासाठी अर्ज


नवी दिल्ली : भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला सिडनीच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेत कॅच घेताना श्रेयस अय्यर जखमी झाला होता. बीसीसीआयनं श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर असून सुधारत असल्याची माहिती दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरी वनडे  25 ऑक्टोबर रोजी पार पडली होती. अॅलेक्स कॅरीचा कॅच घेताना श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. अॅलेक्स कॅरी दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

क्रिकबझनं सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयस अय्यर धोक्याबाहेर असून रुग्णालयात आणखी काही दिवसांसाठी देखरेखीसाठी दाखल असेल अशी माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांकडून श्रेयस अय्यरच्या बरगडीच्या दुखापतीमुळं होणाऱ्या अंतर्गत रक्तश्रावामुळं देखरेख ठेवली जात आहे.  श्रेयस अय्यरच्या कुटुंबीयांकडून तातडीच्या व्हिसासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्या संदर्भातील परवानगी मिळाल्यानंतर कुटुंबीय ऑस्ट्रेलियाला रवाना होतील, अशी माहिती आहे.

श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यांना मुकणार ?

भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे लढतींना मुकण्याची शक्यता  आहे. श्रेयस अय्यर भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज आहे. श्रेयस अय्यर एकाचवेळी आक्रमक आणि संयमी फलंदाजी करु शकतो.  भारताच्या वनडे संघात श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजीला येतो. त्यानं 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रेयस अय्यरनं दमदार कामगिरी केली होती.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका

भारताला ऑस्ट्रेलिया झालेल्या वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. भारतानं 2-1 अशी मालिका गमावली होती. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी, वनडे आणि टी 20 सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान श्रेयस अय्यर संघात नसण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.