कुलदीप पुन्हा दुर्लक्षित, संजू सॅमसनला संघात स्थान! पहिल्या टी-20 साठी पर्थिव पटेलने निवडली प्लेइंग 11
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय टी-20 संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन उत्तम लयीत खेळत आहेत.
अष्टपैलू म्हणून शिवम दुबेने (Shivam Dube) फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात प्रभावी कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) पुनरागमन झाले आहे आणि त्याला इनफॉर्म अर्शदीप सिंह (Arshdeep singh) साथ देणार आहे. याच दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू पर्थिव पटेलने (Parthiv Patel) पहिल्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर केली आहे.
कॅनबेरामध्ये होणाऱ्या या पहिल्या सामन्यासाठी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पर्थिव पटेलने आपल्या आवडीची टीम निवडली. त्याने ओपनर म्हणून इनफॉर्म अभिषेक शर्माची निवड केली असून त्याच्या जोडीला शुबमन गिलला स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर पर्थिवने तिलक वर्मावर (Tilak Verma) विश्वास दाखवला आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मधल्या फळीमध्ये पर्थिवने संजू सॅमसनचा समावेश केला आहे. अष्टपैलू म्हणून शिवम दुबे आणि अक्षर पटेलवर पर्थिवने विश्वास ठेवला आहे. शिवमचा आशिया कप 2025 मधील खेळ जबरदस्त होता आणि अक्षरनेही प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी कायम ठेवली आहे.
गोलंदाजीत पर्थिवने मुख्य जबाबदारी जसप्रीत बुमराहला दिली आहे. वनडे मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर बुमराह आता टी-20 मध्ये धमाका करणार आहे. त्याला अर्शदीप सिंह साथ देणार आहे. स्पिन विभागात पर्थिवने कुलदीप यादवऐवजी वरुण चक्रवर्तीची (Varun chakrawarthy) निवड केली आहे. तसेच नीतीश कुमार रेड्डीनेही (Nitish Kumar Reddy) या संघात स्थान मिळवले आहे.
पर्थिव पटेलने निवडलेली टीम इंडियाची प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.
Comments are closed.