मुंबई गिळायाचा प्रयत्न करणाऱ्या अॅनाकोंडाचं पोट फाडून बाहेर येईन; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे मोदी, शहांवर बरसले

“मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचं भूमिपूजन, आत बातमी आहे, जिजामाता उद्यानात अॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, तो येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायचीय, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, नाही पॉट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही”, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भव्य निर्धार मेळावा वरळी येथील एनएससीआय डोममध्ये पार पडला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असे म्हणाले आहेत.
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.