ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर रोहित शर्माला चाहत्यांचा सवाल, 2027 वर्ल्डकप खेळणार का? हिटमॅन काय म्हणाला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतात परतला आहे.
रोहितने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. या मालिकेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरवण्यात आलं.
रोहितच्या भारतात परतण्यावर त्याच मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. अनेक चाहते खास त्याला भेटण्यासाठी आले होते. रोहितनेही चाहत्यांसोबत सेल्फी घेतल्या. त्याच वेळी एका चाहत्याने तो प्रश्न विचारलाच, जो संपूर्ण देशाच्या मनात होता. रोहित 2027 चा वर्ल्डकप खेळणार का?
भारतीय संघाचा ओपनर रोहित शर्मा जेव्हा मुंबई विमानतळाबाहेर आला, तेव्हा चाहत्यांनी जोरात घोषणाबाजी सुरू केली. मुंबईचा राजा, रोहित शर्मा! काही जण त्याच्यासोबत सेल्फी घेत होते, तर एक चाहता खास रोहितच्या फोटोची टी-शर्ट घालून आला होता. रोहितने त्या चाहत्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. ऑटोग्राफ घेताच त्या चाहत्याने विचारलं, “सर, तुम्ही 2027 वर्ल्डकप खेळणार का? त्यावर तोच चाहता म्हणाला, खेळणार नक्की, हे माझं स्वप्न आहे.
रोहितने त्या चाहत्याचं बोलणं ऐकलं, हलकेच हसला आणि आपल्या गाडीच्या दिशेने निघून गेला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित फक्त 8 धावा करून बाद झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी केली. 97 चेंडूत 73 धावा केल्या, मात्र शतक गाठता आलं नाही. तिसऱ्या वनडेत मात्र रोहितने आपलं शतक पूर्ण केलं आणि 125 चेंडूत 121 धावांची शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
तरीही भारताला ही 3 सामन्यांची मालिका 2-1 ने गमवावी लागली.
Comments are closed.