ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; घणाघाती भाषण


मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उद्धव विचार) यांच्या नेतृत्वात आज शिवसेना पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आपल्या स्टाईलने भाषण करत भाजपा आणि सरकारवर निशाणा साधला. तर, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक यादीतील घोळ पुराव्यासह दाखवून देत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच, आपण दसऱ्याच्या दिवशी भेटलो होतो, भर पावसात आपल्या परंपरेनुसार साजेल असा दसरा मेळावा घेतल्याचे त्यांनी म्हटले.

सर्वाना धन्यवाद देतो की, भाजप असेल, मिंधे असेल, यांच्याकडे जीवाला जीव देणारी माणसं नाहीत. पावसामुळे त्यादिवशी फटक्यातून वाचली. मी विभागप्रमुखांना भेटतो, शाखाप्रमुख यांना आज भेटतो आहे, माझ्या डोक्यात होतं त्यांना भेटावं म्हणून आज भेटलो. आता गटप्रमुख मेळावा आपला बाकी आहे, उपशाखाप्रमुख यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. आदित्यने जे दाखवलं ते काही दिवसात केलेलं काम आहे, अजून त्यात खोलात जायचं आहे, असे म्हणत मतदार यादीबाबत उद्धव ठाकरेंनी महत्वाचं विधान केलं.

ॲनाकोंडा म्हणत टीका, आयोगाला इशारा

मुंबईवर दोन व्यापाऱ्यांच डोळा आहे, आजच एकच येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, भाजप कार्यालयाच भूमिपूजन आणि दुसरी बातमी राणीच्या बागेत अँनाकोंडा आणला जाणार, आज तसाच एक येऊन गेला, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. भूमीपूजन करायला आलाय ना, कर ना? नारळ डोक्यावर फोड किंवा दगडावर फोड. तुमची ब्रह्मचाऱ्याची पिलावळ नाही. गाढवंही गेले, ब्रम्हचारी गेले याचा अर्थ मी सांगत नाही तुम्ही जाऊन शोधा. आपल्यात एक म्हण आहे, यथा राजा-तथा प्रजा.

ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

लोकशाहीत मतदार सरकार निवडतात, आताची परिस्थिती आहे की, सरकार मतदार निवडतात. एका यादीत 1200 नाव आहेत. घर किती झाली, तर 300 घर होतील. त्यामुळे, तुम्ही उपशाखाप्रमुख जाऊन यादीच वाचन करायचं आहे, असा मंत्रच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक, शाखा प्रमुखांना दिला. जर तुम्हाला बोगस आहे, असं वाटलं तर त्याला समोर थोबडवा. भाजपवाले भुरटे चोर आहेत, मोदींना आता मुंबई गिळायची आहे, हे काही नवीन नाही. दोन व्यापाऱ्यांना वाटतं असेल आता 60 वर्ष होऊन गेले. सांडलेल्या रक्ताची किंमत मुंबई विसरली असेल असं त्यांना वाटतं असेल तर त्यांच थडगं बांधायची तयारी ठेवायची, असा सल्ला देखील उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला.

भाजप हा नर्मदेचा औलाद आहे

एक चहावाला पंतप्रधान झाला, आम्ही पाठींबा दिला म्हणून पंतप्रधान झाला. निवडणूक आयोगाला सांगतोय, ह्या गोष्टी सुधरवा नाहीतर निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू, असा इशारा देखील निवडणूक आयोगाला देण्यात आला. भाजप ही बोगस टोळी आहे. आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, पण त्यांना आत्मनिर्भर भाजप बनवता येत नाही, भाडयाने घ्यावे लागत आहेत. नामर्दाची औलाद आहात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका भाजपवर केली.

हेही वाचा

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका

आणखी वाचा

Comments are closed.