अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळाडूसारखी खेळी! गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये जोरदार कामगिरी

रणजी ट्रॉफी 2025-26 (Ranji trophy 2025- 26) मध्ये एकूण 38 संघ सहभागी झाले आहेत. 25 ऑक्टोबरपासून दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झाले असून, त्यातील एक सामना कर्नाटक आणि गोवा यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात गोव्याकडून सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Sachin Tendulkar son Arjun Tendulkar) चमकला आहे. त्याने आधी गोलंदाजीत धमाल केली आणि नंतर फलंदाजीतही आपला जलवा दाखवला. आता अर्जुनची कामगिरी सर्वत्र चर्चेत आली आहे.

कर्नाटकविरुद्ध अर्जुन तेंडुलकरने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने कर्नाटकचा सलामी फलंदाज निकिन जोस आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला कृष्णन श्रीजीत यांना बाद केले. त्यानंतर त्याने मधल्या फळीतला फलंदाज अभिनव मनोहरलाही माघारी पाठवलं. अशा प्रकारे अर्जुनने पहिल्या डावात गोव्याकरिता 3 बळी घेतले.
त्याने 29 षटकांत 100 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या आणि त्याची इकॉनॉमी रेट फक्त 3.44 इतकी होती. गोव्याकडून वासुकी कौशिक यानेही 3 विकेट्स घेतल्या.

गोलंदाजी संपल्यानंतर अर्जुन फलंदाजीला आला आणि तिसऱ्या दिवसाअखेर तो नाबाद 43 धावा (115 चेंडू) करून खेळत होता. चौथ्या दिवशी त्याच्याकडून गोव्याला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत कहर आणि फलंदाजीत दमदार खेळी करत रणजी ट्रॉफीत अष्टपैलू खेळाडूची खेळी केली.

Comments are closed.