मुस्तफाबादचे नाव बदलणार कबीरधाम : मुख्यमंत्री योगी

उत्तर प्रदेश: मुस्तफाबाद आता कबीरधाम म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केली.
संत असांग देव महाराज यांच्या तीन दिवसीय प्रकटोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री योगी सोमवारी लखीमपूर खेरीतील मुस्तफाबाद येथील कबीरधाम आश्रमात पोहोचले.
मोठ्या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 2014 नंतर सर्व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जात होती, तर यापूर्वी हा निधी स्मशानभूमींपुरता मर्यादित होता.
Comments are closed.