Health Tips: सावधान ! तुम्ही मेण लावलेलं सफरचंद खाताय का? ओळखण्यासाठी करा हे उपाय
‘अॅन अॅप्पल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ हे तर प्रत्येकाला माहीतच आहे… सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळेच तज्ञांकडूनही दररोज सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंद हे जगातील सर्वात आरोग्यदायी फळ मानले जाते. पण तुम्ही खात असलेले हे सफरचंद आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहे याचा विचार केला आहे? कारण आजकाल सफरचंद चमकदार करण्यासाठी त्यावर मेण लावले जाते. पण हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. मग बाजारातून आणलेल्या सफरचंदावर असलेले मेण कसे काढायचे? तेच जाणून घेऊया… ( How to remove wax coating from apples )
मेण लावल्याने सफरचंदांना चमक येते, त्यामुळे ते ग्राहकांना अधिक आकर्षित करते. मेण लावल्याने सफरचंदापर्यंत आर्द्रता पोहोचत नाही आणि सफरचंद खराब न होता बराच काळ टिकते. मेण लावलेले सफरचंद खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच सफरचंदाची गुणवत्ताही खराब होते. सफरचंदावर असलेलं मेण काढण्यासाठी काही घरगुती उपाय महत्त्वाचे ठरतात. हे उपाय करून सफरचंद आधी साफ करून त्यानंतर खाणे योग्य ठरते.
कोमट पाणी
सफरचंद स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे कोमट पाणी. सफरचंद कोमट पाण्यात काही वेळ बुडवून ठेवा आणि नंतर ब्रशच्या मदतीने घासून घ्या. स्वच्छ कापडाने पुसून हे सफरचंद खाऊ शकता. यामुळे सफरचंदातील मेण सहजपणे निघते.
व्हिनेगर वॉटर
सफरचंदांमधील मेण काढण्यासाठी व्हिनेगर खूप प्रभावी ठरते. एका भांड्यात थोडे व्हिनेगर आणि पाणी मिसळा. त्यात सफरचंद १०-१५ मिनिटे भिजवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून सफरचंद स्वच्छ करता येते. लिंबाचा रसामुळे मेण विरघळते आणि कीटकनाशके स्वच्छ होतात. १ कप पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि २ चमचे लिंबाचा रस मिसळा. त्यात सफरचंद ५-१० मिनिटे भिजवा. नंतर घासून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
मिठाचे पाणी
सफरचंदाच्या सालींवरील रसायने आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी मिठाचे पाणी फायदेशीर ठरते. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात १-२ चमचे मीठ घाला. त्यात सफरचंद १० मिनिटे भिजवा. नंतर त्यांना हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. यासह शक्यतो सफरचंदाची साल काढून ते खावे. हे काही उपाय करून तुम्ही सफरचंद साफ करून खाल्ल्यास चांगले ठरते.
Comments are closed.