इक्षक जहाज नौदलात सामील होणार आहे

नौदलाचे सामर्थ्य वाढणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदलाला लवकरच नवी शक्ती मिळणार आहे. स्वदेशनिर्मित सर्वेक्षण नौका इक्षकला कोची नौदल तळावर 6 नोव्हेंबर रोजी सैन्यताफ्यात सामील केले जाणार असल्याची माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम आयोजित होणार असून तेथे इक्षकला नौदलात सामील केले जाणार आहे. हा प्रकल्प भारताच्या जलसर्वेक्षण उत्कृष्टता आणि स्वदेशीकरणाच्या दिशेने मैलाचा दगड असल्याचे म्हटले गेले आहे. स्वत:च्या श्रेणीतील तिसऱ्या नौकेच्या स्वरुपात इशकचा ताफ्यात समावेश होणे खास आहे. नौदल आधुनिक आणि प्रगत साधनसामग्री तयार करण्याच्या स्वत:च्या संकल्पावर दृढ प्रतिबद्ध असल्याचे ही बाब दर्शविते. यामुळे क्षमतावृद्धी आणि आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना आणखी अधिक वेग मिळणार असल्याचे वक्तव्यात म्हटले गेले आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडकडून नौका उत्पादन संचालनालय आणि युद्धनौका निरीक्षण पथकाच्या देखरेखीत याची निर्मिती करण्यात आली आहे. इक्षकमध्ये 80 टक्क्यांहुन अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर झाला आहे.

इक्षकची वैशिष्ट्यो..

इशक महिलांसाठी विशेष सुविधा असलेली पहिली एसव्हीएल नौका आहे. इक्षकचा अर्थ मार्गदर्शक असून हे या नौकेच्या भूमिकेचे योग्य प्रतीक आहे. इक्षक स्वत:च्या नावाप्रमाणेच अज्ञात सागरी क्षेत्रांचा नकाशा तयार करत मार्गदर्शक ठरणार आहे. नौकांची सुरक्षित यात्रा सुनिश्चित करणार असून भारताच्या सागरी क्षमतांना मजबूत करणार आहे. यामुळे देशाच्या नौदलाच्या शक्तीत मोठी वाढ होणार आहे.

Comments are closed.