रजनीकांत यांना धमकीचा ई-मेल, घरी बॉम्ब ठेवल्याचा दावा

पोलिसांना रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील घराच्या इथे बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आला. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासणीनंतर हे ई-मेल खोटे असल्याचे निदर्शनास आले. तामीळनाडूतल्या डीजीपी कार्यालयाकडून हा ई-मेल आला होता, त्यात रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असे लिहिले होते. पोलिसांनी ई-मेल खोटे असल्याचे जाहीर केले. यानंतर रजनीकांत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

Comments are closed.