लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी लाहोर शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. या शहरात सर्वात जास्त विषारी धुके आढळले आहेत. रियल टाइम क्वॉलिटी डेटानुसार, लाहोरची एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) 312 पर्यंत पोहोचला आहे. जो जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या मानकांच्या तुलनेत 25 पट अधिक धोकादायक आहे. लाहोरसह पाकिस्तानातील अन्य शहरांची स्थितीही चांगली नाही. या यादीत हिंदुस्थानातील दिल्ली आणि कोलकाता या दोन शहरांचाही समावेश आहे.

पाकिस्तानच्या लाहोर आणि कराची, तर चीनच्या बीजिंग शहरातही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण आहे. लाहोर शहरातील प्रदूषण एकसमान नव्हते. वायू गुणवत्तेच्या स्तराची धोकादायक श्रेणीत नोंदणी झाली आहे. काही क्षेत्रांत आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागत आहे. अल्लामा इक्बाल टाऊन येथील शाळेत एक्यूआयचा स्तर 505 पर्यंत पोहोचला आहे. फौजी फर्टिलायजर पाकिस्तान आणि द सिटी स्कूल शालीमार कॅम्पसने अनुक्रमे 525 आणि 366 एक्यूआय स्तरांची नोंद केली आहे. या ठिकाणचे लाखो निवासी विषारी हवा श्वास घेत आहेत. विषारी हवेमुळे पंजाब प्रांताला हाय अलर्टवर टाकण्यात आले आहे.

राष्ट्रीय रँकिंगमध्ये लाहोरनंतर फैसलाबाद (एक्यूआय 439) आणि मुल्तान (एक्यूआय 438) यांचा समावेश आहे. दोन्हींचे वायू गुणवत्तेचा स्तर धोकादायक मानला जात आहे. गुंजरावाला, बहावलपूर आणि सियालकोट यांसारख्या शहरातही प्रदूषण वाढले आहे. जागतिक वायू गुणवत्ता रँकिंगमध्ये लाहोर (एक्यूआय 272) जगातील सर्वात प्रदूषित शहर असून दिल्ली (एक्यूआय 220), कोलकाता (एक्यूआय 170) समावेश आहे.

Comments are closed.