डॉक्टर तरुणी हॉटेल मधुदीपमध्ये शिरली तेव्हा तिची बॉडी लँग्वेज…. निंबाळकरांच्या मर्जीतील हॉटेल


फलटण डॉक्टरचा मृत्यू : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. भाऊबीजेच्या दिवशी या तरुणीने फलटणच्या मधुदीप हॉटेलमधील (Hotel Madhudeep) खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये (Suicide News) पोलीस अधिकारी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि खासदारांच्या दोन पीएचा उल्लेख असल्याने हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रचंड तापले होते. मृत डॉक्टर तरुणीने तिच्या एका पत्रात उल्लेख केलेला खासदार म्हणजे भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरुन बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले होते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी डॉक्टर तरुणीची हॉटेलमध्ये हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला होता. ज्या हॉटेल मधुदीपमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या हॉटेलचे मालक दिलीप भोसले हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मर्जीतील होते. ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. मात्र, हॉटेल मालक दिलीप भोसले आणि त्यांच्या मुलाने बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. (Phaltan Doctor Suicide News)

सुषमा अंधारे यांनी एकट्या महिलेला रात्री 12 नंतर हॉटेलमध्ये रुम का दिली, असा सवालही उपस्थित केला होता.  एकट्या महिलेला रात्री हॉटेलमध्ये रुम दिली जाते, अशी माहिती मला तरी नाही. तिला कायदेशीर पद्धतीने एन्ट्री दिली होती का? ही तरुणी स्वत:चं घर सोडून हॉटेल मधुदीपमध्ये का गेली होती, असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारले होते. यावर स्पष्टीकरण देताना हॉटेल मालक भोसले यांनी म्हटले की, हॉटेल लॉजिंगमध्ये असला कुठलाही नियम नाही की, 12 नंतर कुठलीही रुम द्यायची नाही. एक माणुसकी म्हणून, महिला आहे, 18 वर्षांच्या वर आहे, तिच्याकडे आयकार्ड होतं म्हणून आम्ही डॉक्टर तरुणाला रुम दिली. आधार कार्डवर तिचा जन्म 1996 चा होता, ती सज्ञान होती. तिला सर्व नियमांचे पालन करुन रुम देण्यात आली. कुठेही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असे हॉटेल मालक भोसले यांनी सांगितले.

Satara News: ‘डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आली तेव्हा फ्रस्ट्रेट होती’

हॉटेल मधुदीपचे मालक भोसले यांनी सांगितले की, डॉक्टर तरुणी रात्री हॉटेलमध्ये आली तेव्हा थोडीशी फ्रस्ट्रेशनमध्ये दिसत होती, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तिचा चेहरा थोडासा पडलेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसेल की, दार उघडताना तरुणी फ्रस्ट्रेट दिसत होती. त्यांच्या देहबोलीतून ही गोष्ट स्पष्टपणे समजून येत होती, असे भोसले यांनी म्हटले. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मला काही बोलायचे नाही. आमच्यावर आणि आमच्या नेत्यावर जी काही चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला, तो चुकीचा होता. फलटणमध्ये कुठेतही विकास होतोय, फलटणची एका नव्या दिशेने वाटचाल सुरु आहे, हे विरोधकांना खपत नसावे, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण केले जात आहे, असा आरोप हॉटेल मालक भोसले यांनी केला.

आणखी वाचा

डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवणारी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला

आणखी वाचा

Comments are closed.